Last Updated: Saturday, October 13, 2012, 14:49
www.24taas.com, वॉशिंग्टनबराक ओबामा `तुमच्यासाठी काहीपण` म्हणत मेडोनाने चक्क न्यू़ड होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा यांची पुन्हा निवड झाल्यास पॉप क्वीन मेडोना स्टेजवर `न्यूड` होऊन आनंद साजरा करणार आहे. स्टेजवर `न्यूड` होण्याची घोषणा खुद्द मेडोनाने केली आहे.
54 वर्षीय मेडोना आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी बराक ओबामा यांना मतदान करून जिंकून द्यावे. देशातील समलैंगिकांच्या अधिकारासाठी ओबामा प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांना देशातील जनतेने पाठिंबा द्यावा, असेही मेडोना हिने सांगितले आहे.
ओबामा ही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये विराजमान होतील. त्यानंतर स्टेजवर काही काळ विवस्त्र होऊन आनंद साजरा करणार असल्याचा निर्धार मेडोनाने केला आहे.
First Published: Saturday, October 13, 2012, 14:40