Last Updated: Saturday, July 13, 2013, 11:17
www.24taas.com, झी मीडिया,लंडन मलाला यूसुफजई हे नाव गेल्या वर्षी जगभरात चर्चेत आलं. पाकिस्तानमध्ये मुलींना शिक्षणावर बंदी घालण्याच्या विरोधात उठलेला हा एक चिमुकला आवाज. तो आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाला. पण आज त्या आवाजाला नवी ओळख मिळालीय.
यूएन अर्थात युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या व्यासपीठावरुन मलालानं आज जगाला उद्देशून भाषण दिलं..तिच्या नावावरुनच आज १२ जुलैला मलाला दिन असंही घोषीत करण्यात आलं. विशेष म्हणजे मलालाचं भाषण संपल्यानंतर तिला युएनमधल्या सर्व रथी-महारथींनी उभं राहून अभिवादन केलं.
अवघ्या १६ वर्षाच्या या पाकिस्तानी मुलीचा हा प्रवास एखाद्या दिव्यापेक्षा कमी नाही. ती आणि तिच्या सारख्या हजारो-लाखो मुलींना शिकता यावा यासाठी तिनं आवाज उठवला.. तिच्यावर तालिबानंन हल्ला केला. तिच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती..पण त्यातून ती बचावली आणि आज ती जगासमोर एक पाकिस्तानी मुलींचा आवाज म्हणून उभी राहिलीय. आपल्या भाषाणात तीनं जगभरातील आपल्या हितचिंतकांचे आभार तर मानलेच शिवाय साक्षरतेसाठी सर्वांना एकत्र येण्याचंही आवाहन केलं.
मलालाचा शिक्षणावर जोरजगभरातल्या लहान मुलांचं अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी, मुलींना शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी विकसित देशांनी पुढे यावे. जगभरातल्या सगळ्यांनाच सहनशीलतेचं मी आवाहन करते. आपण सर्वांनीच जाती, वंश, रंग, लिंग यांच्या आधारावरती पारंपरिक मानसिकता बदलायला हवी.
महिलांना त्यांच्या विकासासाठी स्वातंत्र्य आणि समानतेच्या संधी मिळायला हव्यात. त्यासाठी जगभरातल्या माझ्या बहिणींनी साहसी व्हायला हवं. त्यासाठी त्यांच्यामधल्या शक्तिची आणि गुणांची पुरेपूर जाणीव त्यांना व्हायला हवी. बंधु आणि भगिनींनो, प्रत्येक मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्हाला शाळा हव्यात, शिक्षण हवं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, July 13, 2013, 11:16