Last Updated: Sunday, March 16, 2014, 12:37
www.zee24taas.com, वृत्तसंस्था, क्वालालांपूर `बेपत्ता मलेशिया एयरलाईस विमानाचे अपहरण करुन अपहरणकर्ते भारतावर पुन्हा एकदा ९/११ सारख्या हल्ला करतील` असं ट्वीट अमेरिकेचे माजी उपपरराष्ट्र मंत्री स्ट्रोब टाल्बोट यांनी केलंय.
गुन्हेगारी अन्वेषण सुरु केल्यानंतर बेपत्ता विमानाचा मार्ग बदलण्यात आलाय आणि त्यांच्या संपर्कही बंद केलाय असं, मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांनी सांगितलंय. एएफपी अहवालानुसार, विमानाचा संपर्क तुटल्यानंतर ते पश्चिम दिशेनं गेल्याचं समजतंय.
भारतीय नौसेनेचे जहाजं, विमानं आणि हेलिकॉप्टर बेपत्ता विमानाचे काही संकेत मिळवण्यासाठी अंदमान समुद्र बेट आणि बंगाल उपसागर यांचा शोध करत आहेत. ८ मार्चपासून मलेशियन विमान `एमएच ३७०` बेपत्ता आहे. यात १२ क्रू मेंबरसह २३९ प्रवासी आहेत. जगातील १० देश विमानाचा शोध घेत आहेत. प्रवाशांमध्ये १५४ प्रवासी हे चीनचे आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, March 16, 2014, 11:21