मलेशियाचे भरकटलेले विमान समुद्रात कोसळले, Malaysia Airlines plane with 239 onboard goes missing

मलेशियाचे भरकटलेले विमान समुद्रात कोसळले

मलेशियाचे भरकटलेले विमान समुद्रात कोसळले
www.24taas.com, वृत्तसंस्था, क्वालालंपूर

मलेशियाचे भरकटलेले विमान समुद्रात कोसळल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केला आहे. तर व्हिएतनामच्या सरकारी मीडियाने हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे २३९ प्रवाशी आणि १२ कर्मचाऱ्यांबाबत भिती व्यक्त करण्यात आली आहे.

मलेशिया एअरलाईन्सचे विमान क्वालालंपूर येथून चीनमधील बिजींगकडे जात होते. या विमानात १४ देशांतील प्रवासी होते. सर्वाधिक प्रवासी हे चीनचे होते. दरम्यान, विमान कोसळ्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे. तर व्हिएतनामच्य सरकारी मीडियाने एक नौदलाच्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन भरकटलेले विमान समुद्रात कोसळ्याचे म्हटले आहे. तर चीनने दक्षिण समुद्रात मदतीसाठी जहाज पाठविले आहे.

मलेशिया एअरलाइन्सचं विमान अचानक बेपत्ता झाले होते. या विमानाची माहिती रडारावरून मिळत नसल्याने अपघाताची भिती व्यक्त होत होती. या विमानात २३९ प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. या विमानाच शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. २०० कर्मचारी मदतकार्य करीत आहेत.

मलेशिया एअरलाईन्सचे क्वालांलपूर येथून बिजींगकडे जात असलेले एमएच-३७० हे प्रवासी विमान उड्डाण घेऊन काही अंतरावर जाताच रडावरून गायब झाले. आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास विमानाचा संपर्क तुटला. या विमानात भारतीय प्रवासी नसल्याचे समजते. मात्र १४ देशांचे प्रवासी होते. विमानात चीनचे सर्वाधिक प्रवासी होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 8, 2014, 12:05


comments powered by Disqus