`त्या` सहवैमानिकानं कुणाला केला होता संपर्क? Malaysian Airlines MH370: Co-pilot of missing plane mad

`त्या` सहवैमानिकानं कुणाला केला होता संपर्क?

`त्या` सहवैमानिकानं कुणाला केला होता संपर्क?
www.24taas.com, झी मीडिया, क्वालालंपूर

मलेशियन एअरलाइन्सचे `एमएच ३७०` हे विमान अचानकपणे गायब होण्याचे गूढ संपता संपत नाहीए. यातच आता विमानाच्या मलेशियातील सहवैमानिकाने विमान रडारच्या टप्प्यातून बेपप्ता होण्याआधी स्वतःच्या मोबाईल फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, अशी बातमी समोर येतेय.

मोबाईल फोनचे नेटवर्क मिळणाऱ्या टॉवर्सपासून विमान खूप वेगाने दूर गेल्यानेच हा संपर्क तूटला असावा, हा अंदाज `न्यू स्ट्रेट्स टाईम्स` या मलेशियन वृत्तपत्राचा आहे. तपास अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरून ही माहिती दिल्याचं, संबंधित वृत्तपत्रानं म्हटलंय.

फरीक अब्दुल हमीद असं त्या सहवैमानिकाचे नाव आहे. सहवैमानिक हमीदचा पुन्हा संपर्क जुळला होता. पण, हा कॉल नक्की कुणाला करण्यात आला होता, याविषयी मात्र अधिक तपशील मिळू शकला नाही. म्हणूनच विमान त्यानंतरच बेपत्ता झाल्याचे ठामपणे सांगता येऊ शकत नाही, असं सूत्रांनी म्हटलंय. बेपत्ता सहवैमानिक फरीक आणि कॅप्टन जहारी अहमद शाह यांच्याबाबत तपास सुरू आहे.

मलेशियन एअरलाइन्सचे `एमएच ३७०` हे विमान २३९ प्रवासी घेऊन क्वालालंपूर येथून बीजिंगकडे जात होतं. आत्तापर्यंत जागातील अनेक देशांनी या विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण अजून काहीही काही निष्पन्न झालेलं नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 12, 2014, 16:23


comments powered by Disqus