वाघाची शिकार बनण्यासाठी पिंजऱ्यात मारली उडी, man feeds himself to tigers at china zoo

वाघाची शिकार बनण्यासाठी पिंजऱ्यात मारली उडी

वाघाची शिकार बनण्यासाठी पिंजऱ्यात मारली उडी

www.24taas.com, झी मीडिया, छेंगदू (चीन)
एखाद्या प्राणी संग्रहालयात वाघाला जेवण भरवताना तुम्ही पाहिले असेल, पण एखाद्या व्यक्तीला स्वतः भक्ष्य वाघासमोर झोकून दिल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? धक्का बसला ना.... चीनच्या प्राणी संग्रहालयात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. डिप्रेशनमुळे त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने वाघांच्या पिंजऱ्यात उडी घेतली.

प्राणी संग्रहालयात आलेल्या लोकांना ही घटना पाहून धक्काच बसला. यांग जिन्हाई असे या २७ वर्षीय व्यक्तीचे नाव असून त्याने वाघाच्या पिंजऱ्यात उडी घेतली. रविवारी ही घटना घडली. जिन्हाई हा व्यक्ती सिचुआन प्रदेशातील छेंगदू प्राणी संग्रहालयात वाघांच्या पिंजऱ्याच्या भिंतीवर चढला. बंगाली वाघांच्या जोडी समोर उडी मारून स्वतःला संपविण्याचा त्याचा विचार होता.

या व्यक्तीने मोठ-मोठ्या ओरडून आणि विचित्र हावभाव करून वाघांना चिडविण्याचा प्रयत्न केला. त्याने त्रास दिल्यानंतर नर वाघाने त्याच्यावह हल्ला केला आणि त्याला जखमी केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी वाघाच्या दिशेने एक रसायन फेकले आणि त्याला शांत केले आणि त्या व्यक्तीला वाचवले.

यांग याने या हल्ल्यानंतर ऑनलाइन लिहिले की, प्राणी संग्रहालयातील कैद असलेल्या त्या वाघांना पाहिल्यावर डिप्रेशन वाटते. शिकार करणे आणि मारण्याची वाघांची प्रवृत्ती असते त्यांना यापासून वंचित ठेवण्यात येते. त्यामुळे मी स्वतःला त्या वाघांसमोर झोकून दिले.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 19, 2014, 11:52


comments powered by Disqus