Last Updated: Friday, March 14, 2014, 14:55
www.zee24taas.com, झी मिडीया, ब्राझील आपण पॉपाय नावाच्या कार्टूनसारखे पालक खाऊन स्नायूत ताकद आलीय असं पाहिलं. मात्र ब्राझीलमधील अरलिंडो डिसूझा पालक खात नाही तर जीवघेणी तेलाची इंजेक्शन आणि दारू मिश्रित इंजेक्शन घेतोय.
त्यामुळे त्यांची बायसेप्स २९ इंच असून, ब्राझीलमध्ये एवढी मोठी बायसेप्स असणारा तो एकमेव व्यक्ती आहे. मात्र आता तो या बायसेप्समुळे संकटात सापडलाय. त्याला आपल्या जीवाची चिंता सतावतेय.
ब्राझीलमधील अनेक बॉडीबिल्डर्सना अशा जीवघेणी तेलाची इंजेक्शनची बाधा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे काहीजणांना स्व:ताचे हात गमवावे लागेल तर काहीजणांच्या हे इंजेक्शन जीवावर बेतलयं.
माझा मित्र पॉलिहिनो यांचं निधन या इंजेक्शनच्या जास्त सेवन केल्यामुळं झालं. तुम्ही अशा तेलांचा वापर करु नका असा, सल्ला अरलिंडो यांने दिलाय.
अरलिंडो बॉडी बनवण्यासाठी सुरुवातील स्टिरॉइड्स, हार्मोन्स आणि व्हिटॅमिन यांचे सेवन करायचा. मात्र त्यांच्या जिममधील एका मित्राने त्याला बॉडी बनवण्यासाठी तेलाची इंजेक्शन दिले.
अरलिंडोने सांगितलं की, दोन वर्षीपूर्वी इंजेक्शन घेण्यास सुरुवात केली. तेलाचे इंजेक्शनचे सेवन केल्यानंतर सुरुवातीला फक्त चक्कर आल्यासारखे झाले. इंजेक्शन घेतल्यावरही अरलिंडो व्यायाम करायचा.
मात्र अशा इंजेक्शनने तब्येतीवर विपरीत परिणाम होतात. तसंच डॉक्टरांनी ऑपरेशन करायला नकार दिला आहे कारण त्यामुळे जीव जाण्याचा संभव आहे ही चिंता अरलिंडोला सतावत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, March 14, 2014, 14:44