मनमोहन सिंग आणि झरदारी यांची भेट, manmohan singh & zardari meet

मनमोहन सिंग - झरदारी यांची भेट

मनमोहन सिंग - झरदारी यांची भेट
www.24taas.com, तेहरान
तेहरानमध्ये पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि पाकचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची गुरुवारी भेट झाली. जवळपास तीस मिनिटे ही बैठक सुरु होती.

कसाबची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवल्यानंतर, दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. या बैठकीला पंतप्रधानांसह परराष्ट्रमंत्री एस.एम कृष्णा, परराष्ट्र सचिव रंजन मथाई उपस्थित होते तर पाकिस्तानकडून पाकच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार, रेहमान मलिक आणि बिलावल भुट्टो उपस्थित होते. यावेळी या भेटीत दहशतवादाचा मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात समजतंय.

भारत दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर आहे. याच मुद्यावर दोन्ही नेत्यांनी लक्ष केंद्रीत केलं. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यासंदर्भात सुरु असलेले खटल्यांचा लवकरात लवकर निपटारा केला जावा, अशी ताकिद मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना दिलीय. द्विपक्षीयांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण केलं जाणं आवश्यक आहे, यावर एकमत झालं. दोन तासांपेक्षा जास्त वेळ ही चर्चा सुरू होती.

First Published: Thursday, August 30, 2012, 23:38


comments powered by Disqus