Last Updated: Friday, May 9, 2014, 10:25
www.24taas.com, पीटीआय, पॅरिसपॉप संगिताचा बादशाह स्वर्गीय मायकल जॅक्सन याच्या प्रिन्स, पॅरिस आणि ब्लॅन्केट या तिन्ही मुलांना वार्षिक खर्च म्हणून ८ दशलक्ष यूएस डॉलर्स देण्याचं मंजूर करण्यात आलंय.
मुलांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या राहणीमानासाठीचा खर्च मायकल जॅक्सनच्या संपत्तीतून करण्याचा निर्णय कोर्टानं दिला आहे. त्यामुळं यापुढं मुलांचा आणि त्यांची आजी कॅथरिन जॅक्सन तसंच चुलत भाऊ टीजे जॅक्सन यांचा खर्च मायकल जॅक्सनच्या संपत्तीतून होणार आहे. यात ३ दशलक्ष यूएस डॉलर्स मुलांच्या शिक्षणासाठी, ३ लाख यूएस डॉलर्स त्यांच्या सुट्ट्यांमधील खर्चासाठी आणि ६ लाख यूएस डॉलर्स त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकासाठी देऊ करण्यात येणार आहेत.
तसंच मायकल जॅक्सन यांच्या राहत्या घराचं २ लाख यूएस डॉलर्स वार्षिक भाडंही जॅक्सनच्या संपत्तीतून खर्चिलं जाणार आहे. त्याचबरोबच तिन्ही मुलांना दरमहा १५ हजार यूएस डॉलर्स वैयक्तिक खर्चासाठी मिळणार आहेत आणि मुलांची काळजी घेण्यासाठी आजी कॅथरिन यांना १.२ दशलक्ष यूएस डॉलर्स दरवर्षी देण्यात येणार आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 9, 2014, 10:25