Last Updated: Wednesday, August 29, 2012, 15:36
www.24taas.com, वाशिंग्टनअमेरिकेच्या फर्स्ट लेडी आणि बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा ह्या यांचा टॉपलेस फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे अमेरिकेत खळबळ माजली आहे.
मॅगझीनच्या कव्हरवर मिशेल ओबामांना एका दासीच्या रूपात दाखवण्यात आले असून त्यात अंगावरचा गाऊन खाली सरकल्याचे दाखवले आहे. हा फोटो 1800व्या शतकातील एका पोट्रेटवर ट्रिक फोटोग्राफी करून बनवण्यात आले आहे.
मॅगझीन कव्हरवर ट्रिक फोटोग्राफी करून एका श्वेतवर्णीय दासीच्या पोट्रेटवर मिशेल ओबामा यांचा चेहरा जोडण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे ज्या पोट्रेटवर मिशेल यांचा चेहरा जोडण्यात आला आहे. तो फ्रेंच कलाकार मेरी बेनिस्ट यांनी बनवलेला आहे.
First Published: Wednesday, August 29, 2012, 15:36