इराकमधील बॉम्बस्फोटात ३० ठार, ७० जखमी , Militants attack police HQ in Iraq, 30 killed

इराकमधील बॉम्बस्फोटात ३० ठार, ७० जखमी

इराकमधील  बॉम्बस्फोटात ३० ठार, ७० जखमी
www.24taas.com,किरकूक

उत्तर इराकमध्ये झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बस्फोटात ३० ठार ते ३० जण जखमी झालेत. हा हल्ला पोलीस मुख्यालयाच्या परिसरात झाला.

उत्तर इराकमधील किरकूक शहरातील पोलीस मुख्यालयाच्या आवारात दोन बॉम्बस्फोट करत पोलीस मुख्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी प्रथम एका कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला.

अंगावर स्फोटके बांधलेल्या आत्माघतकी हल्लेखोरांना प्रवेशव्दारावर स्वत:ला उडवले. अन्य शस्त्रधारी हल्लेखोरांचा मुख्यालयात घुसण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रवेशव्दारावर स्फोट घडवला. पण हल्लेखोरांचा प्रयत्न फसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या आत्माघतकी हल्ल्यात बळी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इराकमध्ये हिंसाचार आणि बॉम्बस्फोट घडत असल्याने भीती कायम असून नागरिक भितीच्या छायेखाली वावरत आहेत. तर शिया-सुन्नी वादातून इराकमध्ये हिंसाचार सुरु असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

First Published: Sunday, February 3, 2013, 15:57


comments powered by Disqus