Last Updated: Saturday, August 18, 2012, 21:24
www.24taas.com,बीजिंगवेन ज़िया यू या चीनच्या सौंदर्यवतीने या वर्षीचा मिस वर्ल्डचा किताब जिंकलाय. तर मिस इंडिया वान्या मिश्रा पहिल्या सात स्पर्धकांमध्ये निवडली गेली.
चीनमध्ये पार पडलेल्या ६२ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस वेल्सने दुसरा तर मिस ऑस्ट्रेलियाने तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत विविध देशातल्या ११७ स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. त्यात मिस इंडिया वान्या मिश्रा पहिल्या सातमध्ये जाण्यात यशस्वी ठरली. याच स्पर्धेतल्या सामाजिक कार्यासाठीचा पुरस्कारही वान्या मिश्रा हिला मिळाला.
वेन ज़िया यू हीने संगीताचा अभ्यास केला आहे. तिने संगीताचा अभ्यास केल्याने तिला संगीत शिक्षक होण्याची ईच्छा आहे. तिला जेवन करण्याची आवड आहे. तिला फिरण्याची तसेच नृत्याची आवड आहे. तिला हा मुकुट मिळाल्याने तिच्या डोळ्यातून आनंदाअश्रू आले.
First Published: Saturday, August 18, 2012, 20:56