मिस फिलिपिन्स मेगन यंग बनली मिस वर्ल्ड-२०१३! Miss Philippines is Miss World 2013

मिस फिलिपिन्स मेगन यंग बनली मिस वर्ल्ड-२०१३!

मिस फिलिपिन्स मेगन यंग बनली मिस वर्ल्ड-२०१३!
www.24taas.com , वृत्तसंस्था, बाली

फिलिपिन्सची मेगन यंग यंदाची मिस वर्ल्ड-२०१३ बनलीय. फ्रान्सची मैरीन लॉरफेलिन दुसऱ्या स्थानावर तर घानाची कैरांजर ना ओकेली शूटर हिनं मिस वर्ल्ड २०१३ मध्ये तिसरं स्थान पटकावलं. २३ वर्षीय मेगन यंग आणि मिस इंडिया नवनीत कौर ढिल्लनसह जगभरातल्या एकूण १२६ सौंदर्यवती तरुणी मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

मिस इंडिया नवनीत कौर स्पर्धेत पहिल्या २० स्पर्धेकांमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाली. यंदा मिस वर्ल्ड स्पर्धेचं ६३वं वर्ष होतं. स्पर्धेची विजेती निवडण्याचं काम मोठ-मोठ्या परिक्षकांनी केलं. यात ब्रिटिश टेलिव्हिजनचे कार्यकारी निर्माता आणि दिग्दर्शक केन वारविक, मिस वर्ल्ड संघटनेचे अध्यक्ष जूलिया मोर्ले, भारतीय मीडिया समूह बेनेच कोलमॅन आणि कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापन संचालक विनीत जैन यांचा समावेश होता.

मिस वर्ल्ड-२०१३ यंगचा जन्म अमेरिकेत झाला. वयाच्या १०व्या वर्षी ती फिलिपिन्सला गेली. सध्या ती डिजिटल फिल्म निर्मितीचा अभ्यास करतेय. शिवाय अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये तिनं कामही केलंय.

मिस वर्ल्ड- २०१३ चा पुरस्कार जिंकल्यानंतर यंग म्हणाली, तिच्या आयुष्यावर आईचा खूप प्रभाव आहे. शिवाय फिलिपिन्सचे नागरिक अतिशय मेहनती असतात, कोणत्याही संकटाला ते घाबरत नाहीत, नेहमी दुसऱ्यांची मदत करतात, असंही यंग म्हणाली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 29, 2013, 08:45


comments powered by Disqus