Last Updated: Tuesday, March 11, 2014, 17:40
www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंगबेपत्ता मलेशिया विमानाच्या शोध घेण्यात यश आलंय. मलेशिया सैन्याच्या मते त्यांच्या रडारवर बेपत्ता विमान मलक्काच्या जलडमरूममध्ये असल्याचे संकेत मिळालेत. मलक्का जलडमरुममध्ये त्या ठिकाणापासून खूप दूर आहे. जिथं विमानानं संपर्क साधला होता.
या दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी दोन संशयितांचे रेखाचित्र जारी केले आहेत. हे दोन्ही संशयित बेपत्ता विमानातून प्रवास करत होते. मलेशियातील हे विमान तीन दिवसांपूर्वी व्हिएतनामच्यापासून बेपत्ता झाले होते.
मलेशिया एअरलाईन्सनं बेपत्ता विमानातून चोरीच्या पासपोर्टद्वारे प्रवास करणाऱ्या दोन संशयितांपैकी एकाची ओळख पटवली होती. मलेशियन स्टार या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार कुआलालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून या संशयिताची ओळख पटवण्यात आली. कुआलालंपूरहून बीजिंगला जाणाऱ्या या विमानाच्या शोधासाठी अमेरिकेसह, रशिया आणि इतर अनेक देशांचे ३२ विमान आणि ४० जहाज बेपत्ता विमानाचा शोध घेण्याचं काम करतायेत.
मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी जास्तीतजास्त अमेरिकेचं सैन्य मदत करेल, असं बोईंग कंपनीनं म्हटलंय. मलेशिया एअरलाईन्सचं ७७७ हे विमानाला थायलंडच्या खाडीत अपघात झाल्याची भीतीही व्यक्त होतेय.
मात्र अचानक बेपत्ता झालेलं बोईंग ७७७ या मॉडेलचं हे विमान यापूर्वी एकदाच दुर्घटनाग्रस्त झालंय. दोन इंजिन असलेलं हे विमान सुरक्षेच्या दृष्टीनं चांगलं समजलं जातं. १९९५मध्ये पहिल्यांदा सेवेत सहभागी झालेलं हे विमान जगातील सर्वाधिक वेळा उडणारं प्रवासी विमान आहे.
मात्र विमानाच्या अचानक पणे बेपत्ता झाल्यानं सर्वच जण चिंताग्रस्त झाले आहेत. या विमानात १२ क्रू मेंबरसह २३९ प्रवासी होते. त्यात भारतीयांचाही समावेश आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 11, 2014, 17:40