पाकच्या मलालाची नोबेलसाठी शिफारस, Mlala can get the Nobel Peace Prize

पाकच्या मलालाची नोबेलसाठी शिफारस

पाकच्या मलालाची नोबेलसाठी शिफारस
www.24taas.com,ओस्लो

स्त्री शिक्षणाबरोबरच शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या मलाला युसूफजाई हिच्यावर तालिबानींनी जीवघेणा हल्ला केला. यातून बचावलेल्या मलाला हिची यंदाच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

तालिबानींना आव्हान देत स्त्री शिक्षणासाठी मलाला य्मुझूफझाई प्रयत्न करीत होती. स्त्री शिक्षणासाठी शांततेच्या मार्गाने लढा देत होती. मलालाकडे मानवी हक्क आणि लोकशाहीचे प्रतीक म्हणून पाहिले जात असल्याने तिच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, इस्लामाबाद येथून देण्यात आलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानी शिक्षण सुधारक मलाला युसूफजाईवर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया केली जाणार आहे. कवटीची हानी झालेल्या भागावर शस्त्रक्रिया होण्याची ही दुसरी वेळ आहे.

बर्मिंगहॅम येथील क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात मलालावर येत्या दहा दिवसांत ही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. तिच्या डोक्यात धातूची एक पट्टी तर कानात एक छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवण्यात येण्याची शक्यता आहे.

First Published: Saturday, February 2, 2013, 20:29


comments powered by Disqus