Last Updated: Wednesday, July 24, 2013, 17:23
www. 24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टनगुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा व्हिसा कसा मिळणार नाही, याची मोर्चेबांधणी विरोधकांनी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतातील काही खासदारांनी अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र पाठविले आहे. यावर या खादसारांच्या सह्या आहेत.
अमेरिकेचा व्हिसा मिळावा, यासाठी भाजप अध्यक्ष राजनाथसिंह प्रयत्न करत करत आहे. मात्र, भारतातील जवळपास ६५ खासदारांनी बराक ओबामा यांना पत्रे लिहून मोदींना व्हिसा देऊ नये, अशी मागणी केलेय. अमेरिकेने व्हिसा न देण्याचे धोरण कायम ठेवावे, असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
बारा पक्षांच्या खासदारांनी मोदींना व्हिसा मिळू नये म्हणून धडपड सुरू केली आहे. एका पत्रावर राज्यसभेच्या २५ तर दुसऱ्या पत्रावर लोकसभेतील ४० सदस्यांच्या सह्या आहेत. ही दोन्ही पत्रे अनुक्रमे २६ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर २०१२मध्ये पाठविण्यात आली आहेत. ती पत्रे २१ जुलै २०१३ व्हाइट हाऊसला पुन्हा एकदा फॅक्सद्वारे पाठविण्यात आली आहेत.
बराक ओबामांना पत्रे पाठविण्यासाठी राज्यसभेतील अपक्ष खासदार मोहमद अबीद यांनी पुढाकार घेतला होता. ही पत्रे आताच सार्वजनिक करण्यात येत आहेत, असे अबीद यांनी स्पष्ट केले. या पत्रांवर स्वाक्षरी केलेल्या खासदारांमध्ये माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते एम. पी. अच्युतन यांचा समावेश आहे. मात्र, येचुरी यांनी आपण अशा पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचे म्हटले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 24, 2013, 15:58