Last Updated: Monday, May 27, 2013, 12:56
www.24taas.com, झी मीडिया, ह्युस्टन हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मृत ठरविण्यात आलेल्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर मृत झालेली ती महिला जिवंत झाली. ही वास्तवातील घटना असून हा निसर्गाचा चमत्कार अमेरिकेत पाहायला मिळाला.
मिसूरी सिटीतील एक शिक्षिका एरिका निगरेली हिने हा निसर्गाचा चमत्कार अनुभवला. विद्यार्थ्यांना शिकवत असताना एरिका अचानक बेशुद्ध पडली. त्यावेळी ती ३६आठवड्यांची गर्भवती होती. तिचा पती नाथन त्याच शाळेत शिक्षक. तो जवळच्याच वर्गात शिकवित होता. याबाबतची त्याला माहिती देण्यात आली.
सहकार्यांकनी एरिकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र ३२ वर्षीय एरिकाच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते. शरीर गार पडले होते. अशा स्थितीत डॉक्टरांनी तिला तांत्रिकदृष्ट्या मृत घोषित केले. मात्र त्याचवेळी तिच्या पोर्टातील गर्भाला जीवदान देण्याचा निर्णय घेतला.
तिची `पोस्टमार्टम डिलेव्हरी` करण्यात आली. तिने मुलीला जन्म दिला. या मुलीचे नाव एलायला ठेवण्यात आलेय. एलायना डॉक्टरांच्या हातात असतानाच एलायला आईच्या हृदयाचे ठोके अचानक पुन्हा सुरू झाले आणि ती पुन्हा जिवंत झाली. हा निसर्गाचा अनुभव अमेरिकेत पाहायला मिळाला. यावर्षी फेब्रुवारीतील ही घटना आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 27, 2013, 12:50