Last Updated: Wednesday, August 14, 2013, 20:30
www.24taas.com, झी मीडिया, फ्लोरिडाबाजारात किंवा मॉलमध्ये अनेक गृहोपयोगी वस्तूंसाठी एकावर एक फ्रीची ऑफर देऊन ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचं काम अनेक कंपन्या करत असतात. मात्र अशीच जाहिरात वेश्याव्यवसायासाठीही वापरणाऱ्या आई-मुलीला अटक करण्यात आलं आहे.
फ्लोरिडा येथील रोमोना रामोतर या ४३ वर्षीय महिलेने आपली २३ वर्षीय मुलगी डॅनिएला सिनानन हिच्यासोबत ‘एकावर एक फ्री’ ही ऑफर सुरू केली होती. एवढंच नव्हे, तर एका वृत्तपत्रात यासंबंधी जाहिरातही दिली होती. ‘रॉक द वर्ल्ड विथ द टू फॉर वन स्पेशल’ अशा मथळ्याखालील जाहिरातीत सेक्ससाठी एकावर एक फ्री ही ऑफर दिली होती. यासाठी १६० डॉलर्स पडतील, असंही या जाहिरातीत नमूद केलं होतं.
मात्र ही जाहिरात एका पोलिसाच्या दृष्टीस पडली. त्याने १६० रुपये देण्याचं आमिष दाखवत दोघींची भेट घेतली.आणि त्यांना अटक केलं. वेश्यावृत्तीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप या आई-मुलीवर आहे. या दोघीही वेश्याच होत्या. मात्र अधिक ग्राहक खेचण्यासाठी ‘एकावर एक फ्री’ची जाहिरात त्यांनी दिली होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 14, 2013, 20:30