परवेझ मुशर्रफांचा जामीन अर्ज फेटाळला, Musharraf refused bail

परवेझ मुशर्रफांचा जामीन अर्ज फेटाळला

परवेझ मुशर्रफांचा जामीन अर्ज फेटाळला
www.24taas.com,झी मीडीया,इस्लामाबाद< /b>

पाकिस्तान कोर्टाने माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचा जामीन अर्ज फेटाळला. मुशर्रफ यांच्या वकिलानीं अंतिम जामिनाचा अवधी वाढवण्याचा आग्रह केला होता. हा जामीन अर्ज लाहोर हाय कोर्टाच्या रावळपिंडी खंडपीठाकडून फेटाळण्यात आला.

बेनझीर भुट्टोंच्या हत्याप्रकरणी आपल्याच फार्महाऊसवर नजरबंदीत असणाऱ्या मुशर्रफांच्या या निर्णयामुळे अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. मुशर्रफ यांना १७ एप्रिल रोजी एका आठवड्यासाठी जामीन देण्यात आला होता.

मुशर्रफ यांच्यावर बेनझीर यांना पर्यायी सुरक्षा देण्यात अपयशी ठरले असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. डिसेंबर २००७मध्ये रावलपिंडी येथे हत्या करण्यात आली होती. मुशर्रफ यांचीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

माजी लष्कर प्रमुख मुशर्रफ यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती. २००७मधील आणीबाणीच्या परिस्थितीत ६० न्यायाधीशांना अटक केल्यासबंधी त्यांना ही अटक करण्यात आली होती. मुशर्रफ यांना ११मे रोजी होणारी निवडणूकी लढवण्यास ही बंदी घालण्यात आली आहे.

First Published: Thursday, April 25, 2013, 18:20


comments powered by Disqus