Last Updated: Wednesday, October 24, 2012, 16:09
www.24taas.com, यंगून, म्यानमार म्यानमारच्या पश्चिम भागात मुस्लिम आणि बौद्ध धर्मीयांमध्ये जातीय तणाव निर्माण झालाय. यावेळी काही प्रमाणात हाणामारीच्या आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्याचं समजतंय. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय.
माहिती मंत्रालयानं हे वृत्ताला दुजोरा देत, अजूनही या भागात हिंसेच्या घटना सुरू असल्याचं म्हटलंय. सुरक्षा यंत्रणा परिस्थिती हाताळण्याचा आणि ताब्यात आणण्याचा कडेकोट प्रयत्न करतायत. आत्तापर्यंत हजारोंच्या संख्येत घरांना आगीच्या हवाली करण्यात आलीत. तर अनेक ठिकाणी हिंसेच्या घटना घडल्यात. काही कारणावरून रोहिंग्या मुस्लिम आणि बौद्ध धर्मीयांमध्ये रविवारच्या रात्री झालेल्या वादानंतर या हिंसात्मक घटनांना सुरुवात झालीय.
First Published: Wednesday, October 24, 2012, 16:09