मोदी जगातिक नेत्यांच्या पगाराबाबत 12 व्या स्थानावर Modi`s Salary for name on the list at No. 12

नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांच्या पगाराबाबत 12 व्या स्थानावर

नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांच्या पगाराबाबत 12 व्या स्थानावर
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे नाव जगातील टॉप लिडरच्या यादीत समाविष्ठ झालेय. मात्र, पगाराच्याबाबतीत नरेंद्र मोदी अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या खूप मागे आहेत. पे चेक इंडिया या नावाच्या वेबसाईटने जगातील प्रमुख नेत्यांचे पगार सांगितले आहेत.

या यादीनुसार नरेंद्र मोदी यांचे नाव 12 व्या स्थानावर आहे. त्यांचे वर्षाचे वेतन 19 लाख 20 रुपये आहे.

यातमध्ये रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांचा पगार हा सर्वाधिक आहे. त्यांना वर्षाला 19 कोटी 22 लाख वेतन मिळते.

दुसऱ्या क्रमांकावर आहेत अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा. त्यांची वार्षिक सॅलरी आहे 2 कोटी 33 लाख रुपये.

जर्मनीचे चान्सलर एंजेला मरकेल यांचेही वेतन बराक ओबामा यांच्या पगाराइतके आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दरवर्षी 1 कोटी 66 लाख रुपये वेतन मिळते.

या यादीत 11 व्या स्थानावर चीनचे राष्ट्रपती जाई जिनपिंग आहेत. त्यांना वर्षाला 23 लाख 34 हजार रुपये पगार मिळतो.

या यादीत भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही नाव आहे. मुखर्जी यांना वर्षाला 18 रुपये वेतन मिळते.

पद आणि राजकिय ताकद याचा या वेतनाशी विशेष काही देणे-घेणे असत नाही.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 11, 2014, 15:04


comments powered by Disqus