`नासा`चं चांद्रयान चंद्रावर धडकून होणार नष्ट, nasa ladee lunar probe will crash into the moon

`नासा`चं चांद्रयान चंद्रावर धडकून होणार नष्ट

`नासा`चं चांद्रयान चंद्रावर धडकून होणार नष्ट

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये `नासा` या अमेरिकेची अंतराळ एजन्सीनं चंद्राच्या पृष्ठभागावर एक यान धाडलं होतं. वैज्ञानिक पद्धतीनं काही आकडे गोळा करण्याचं काम हे यान करत होतं. पण, या महिन्याच्या शेवटी या यानाचं जीवन संपुष्टात येणार आहे. हे अंतराळ यान या महिन्याच्या शेवटी चंद्राच्या पृष्ठभागावरच नष्ट होणार आहे.

एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे नासानं ही माहिती दिलीय. `एलएडीईई` हे अंतराळ यान चंद्रावर धडकण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे, चंद्राच्या ज्या भागावर हे यान धडकण्याची शक्यता वर्तविली जातेय तो भाग पृथ्वीरून दिसत नही. चंद्रावर धडकल्यानंतर साहजिकच हे यान नष्ट होणार आहे. या अंतराळ यानाच्या धडकेनं चंद्राच्या पृष्ठभागाला मात्र कोणतीही इजा होऊ नये, यासाठी वैज्ञानिक सध्या प्रयत्न करत आहेत.

`एलएडीईई` चे प्रकल्प व्यवस्थापक बटलर हाइन यांच्या म्हणण्यानुसार, चंद्राचं गुरुत्व क्षेत्र दगडाच्या टणक तुकड्यांनी भरलेलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरही खड्डे, उंचवटे आणि दऱ्यांनी भरलेलं असल्यामुळे या अंतराळ यानाच्या संचालनात चपळतेची आवश्यकता भासणार आहे. यामध्ये वैज्ञानिक अयशस्वी झाले तर एलएडीईई अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागाला इजा पोहचवू शकतं.

यामुळचे, या अंतराळ यानाला चंद्राच्या पृष्ठभागाहून तीन-चार किलोमीटर उंचीवर नियंत्रित करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे, शेवटच्या क्षणी अंतराळ यानातील इंधन संपण्यापूर्वीपर्यंतचे वैज्ञानिक आकडे प्राप्त करता येऊ शकतील. यानंतर एलएडीईई चंद्राच्या पृष्ठभागावर धडकून नष्ट होईल.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 11, 2014, 08:29


comments powered by Disqus