चंद्रावर तुळस उगवणार, नासाचा पुढाकार, NASA Project Looks To Grow Turnips And Basil On The Moon

चंद्रावर तुळस उगवणार, नासाचा पुढाकार

चंद्रावर तुळस उगवणार, नासाचा पुढाकार
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

चंद्रावर तुम्हाला घर घेता येईल का? जर तुम्हा ते स्वप्न पाहात असाल तर ते भविष्यात शक्य आहे. कारण अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासा नविन उपक्रम हाती घेत आहे. चंद्रावर मानवी पाऊल पडल्यानंतर तेथे वनस्पती लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नासा पहिल्यांदा चंद्रावर तुळस किंवा बीट या वनस्पतीचे बीज लावून बघणार आहेत.

चंद्रावर वस्ती होती का, याची चाचपणी सुरू आहे. ते पाहण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावर आधी वृक्षारोपण करणार आहे. नासा पहिल्यांदा चंद्रावर तुळस किंवा बीट या वनस्पतीचे बीज लावून बघणार आहेत. हा प्रयोग म्हणजे गुगल व नासा यांनी संयुक्तपणे आखलेल्या गुगल-ल्युनार एक्स पुरस्कार स्पर्धेचा भाग आहे. ही स्पर्धा ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत चालणार आहे.

या स्पर्धेत काही खासगी कंपन्याना आंमत्रित केल्या जाणार आहे. काही कंपन्या नासाच्या सहकार्याने चंद्रावर काही रोपे लावणार आहेत. एक्स्प्रेस लँडर या अवकाश यानाद्वारे कॅन किंवा कपात लावलेली ही रोपे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवली जाणार आहे. तसेच त्याल कॅमेरा आणि सेन्सरही बसवलेला असेल. चंद्रावर या रोपांची वाढ कशी होते, ते चंद्रावरील वातावरणात कसा प्रतिसाद देतात, पृथ्वी आणि चंद्रावरील वृक्ष लागवडीत नेमका काय फरक आहे, याचा अभ्यास या प्रयोगातून केला जाणार आहे. म्हणजेच चंद्रावर राहण्याजोगे वातावरण आहे का ते पाहिले जाणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 30, 2013, 12:40


comments powered by Disqus