Last Updated: Thursday, November 14, 2013, 21:44
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा)नं शनी ग्रहाचा एक दुर्मिळ फोटो जाहीर केलाय. या प्राकृतिक फोटोत शनी ग्रहासोबतच त्याचे सातही चंद्र आणि शनीच्या गोलाकार कडांबरोबर पृथ्वी, शुक्र आणि मंगळ ग्रहही स्पष्ट दिसून येत आहेत.
शनी आणि त्याच्या उपग्रहांशिवाय पृथ्वी, शुक्र आणि मंगळ ग्रहाचा हा वेगळा फोटो घेतलाय नासाच्या कॅसिनी अंतराळ यानानं घेतलाय. कॅसीनीनं क्लिक केलेला हा फोटो तुम्हालाही हे दृश्यं प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यांसमोर घडतंय, असं भासवतोय. नासाच्या वॉशिंग्टनच्या ‘न्यूजियम’मधून हा फोटो पहिल्यांदा जाहीर केलाय.
कॅसिनीच्या छायांकन टीमनं या विहंगम दृश्यासाठी १४१ वेगवेगळ्या कोणांतून फोटो घेतल्यानंतर हा दुर्मिळातला दुर्मिळ फोटो त्यांच्या हाती लागलाय. या फोटोत शनिसोबत सात चंद्र आणि शनीच्या गोलाकार कडांसोबत पृथ्वी, शुक्र आणि मंगळ ग्रहही व्यवस्थित दिसू शकतात.
बॉल्डरच्या स्पेस सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये कॅसिनीच्या छायांकन टीमचे प्रमुख कॅरोलिन पोर्को यांच्या म्हणण्यानुसार, या फोटोनं ब्रम्हांडातील एक सर्वांगसुंदर दृश्यं पाहायला मिळालंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, November 14, 2013, 21:44