Last Updated: Sunday, February 3, 2013, 12:35
www.24taas.com, वॉशिंग्टनभारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला आणि तिच्यासोबत अंतराळयानात असणारे अंतराळवीर हे पृथ्वीवर जिवंत परतू शकणार नाहीत, याची नासाला पूर्वकल्पना होती, असा गौप्यस्फोट तब्बल 10 वर्षांनी करण्यात आला आहे.
कोलंबिया यानाचे प्रोग्रॅम मॅनेजर वेन हेल यांनी आपल्या ब्लॉगमध्ये कल्पना चावला आणि इतर अंतराळवीरांच्या मृत्यूबद्दलचा थरकाप उडवणारा गौप्यस्फोट केला. कोलंबिया अंतराळयानात झालेला बिघाड आधीच लक्षात आला होता. मात्र अंतराळवीरांना यासंदर्भात कुठलीही माहिती न देण्याची सूचना करण्यात आली होती.
यानातील बिघाडाची माहिती अंतराळवीरांना मिळाली असती, तर कदाचित ते वातावरणाच्या कक्षेत न शिरता अंतराळातच फिरत राहिले असते. मात्र त्यांनी असं फिरत राहाण्यापेक्षा अंतराळातून वातावरणात प्रवेश करत थेट मृत्यूला सामोरे जावे, अशीच इच्छा नासातील तो प्रोजेक्ट हाताळणाऱ्या वरीष्ठ शास्त्रज्ञांची होती. ही माहिती अधिकृतपणे जाहीर करणारे वेन हेल हे पहिलेच व्यक्ती आहेत.
First Published: Sunday, February 3, 2013, 12:19