जगाचा नाश होणार... ही केवळ अफवा!, nasa say world will not end

जगाचा नाश होणार... ही केवळ अफवा!

जगाचा नाश होणार... ही केवळ अफवा!
www.24taas.com, वॉशिंग्टन

जग या वर्षाच्या आखेरमध्ये खरोखरच समाप्त होणार आहे का? या अनेकांच्या प्रश्नाला अखेर ‘नासा’नं नकारार्थी उत्तर दिलंय. २१ डिसेंबर २०१२ रोजी महाप्रलय येऊन या जगाचा नाश होईल, ही भविष्यवाणी खोटी असल्याचं ‘नॅशनल ऍरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’नं (नासा) म्हटलंय.

शास्त्रज्ञांनी २०१२ मध्ये पृथ्वी नष्ट होण्याची भविष्यवाणी साफ साफ फेटाळून लावलीय. गेल्या चार अरब वर्षापासून अस्तित्वात असलेली पृथ्वी यापुढेही आपलं अस्तित्व कायम राखणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. ही माहिती त्यांनी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलीय.

निबिरु नावाचा ग्रह पृथ्वीवर आदळून संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल अशी अफवा पसरल्यानं अनेकजण धास्तावले होते. पण ही अफवा असल्याचं नासानं सांगितल्यानं या सगळ्यांनाच दिलासा मिळालाय.

First Published: Saturday, December 1, 2012, 14:23


comments powered by Disqus