Last Updated: Monday, January 21, 2013, 15:18
www.24taas.com, न्यू यॉर्कभारतात होणारा महाकुंभ मेळा आता हार्वर्ड युनिवर्सिटीत अभ्यासाचा विषय बनला आहे. या कुंभ मेळ्याच्या आयोजनातील आर्थिक बाजूचा तसेच संगमनगरी अलाहबादच्या इतर धार्मिक आयोजनाचा यात सविस्तरपणे अभ्यास करण्यात येणार आहे.
हार्वर्डचे आर्ट्स अँड सायन्स, स्कूल ऑफ डिझायन, हार्वर्ड बिझनेस स्कूल, स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, हार्वर्ड मेडिकल स्कूल, हार्वर्ड डिव्हिनिटी स्कूल आणि हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे एक पथक अलाहबादचा दौरा करणार आहे. हे शोध पथक महाकुंभच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहे.
दर १२ वर्षांनी आयोजित होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात लाखो लोक सामिल होतात. कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक तात्पुरते शहर या ठिकाणी वसविण्यात येते. यात श्रद्धाळू आणि पर्यटक एक महिन्यांपेक्षा अधिक काळ वास्तव्यास असतात. या अभ्यासाला मॅपिंग इंडियाज कुंभ मेळा असे नाव देण्यात आले आहे.
First Published: Monday, January 21, 2013, 15:18