अंतराळवीर नील आर्मस्ट्रांग यांचं निधन, neil armstrong is no more

अंतराळवीर नील आर्मस्ट्रांग यांचं निधन

अंतराळवीर नील आर्मस्ट्रांग यांचं निधन
www.24taas.com, वॉशिंग्टन

चंद्रावर पहिल्यांदा आपला पाय रोवणाऱ्या अंतराळवीर नील आर्मस्ट्रांग यांचं शनिवारी निधन झालंय. मृत्यूसमयी ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या हृदयावर नुकतीच शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

20 जुलै 2969 रोजी ‘अपोलो-11’ या अंतराळयानातून आर्मस्ट्रांग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेऊन एक इतिहास घडवला होता. सहकारी एडविन एल्ड्रिन यांच्यासोबत आर्मस्ट्रांग यांनी जवळपास तीन तास चंद्रावर भ्रमण केलं होतं.

First Published: Sunday, August 26, 2012, 08:35


comments powered by Disqus