Last Updated: Wednesday, August 22, 2012, 19:55
www.24taas.com, न्यूयॉर्कपान खाऊन थुकंण ही काही भारतीयांसाठी नवी बाब राहिलेली नाही. मात्र आता भारतीय लोकांच्या या पान खाऊन पिंक टाकण्याच्या सवयीने अमेरिका शासन मात्र चांगलच जेरीस आलं आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातही बनारस पानाचे ठेले प्रसिध्द झाले असून पानाच्या पिंकांच्या समस्येमुळे तेथील स्वच्छता यंत्रणा हैराण झाली आहे.
न्यूयॉर्कमधील जॅकसन हाईटस भागात दक्षिण आशियातून आलेले अनेक लोक राहतात. तेथील बाजारात हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगला देश आणि नेपाळमधील वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येतात. या बाजारातील बनारस पानाचे ठेले आता आकर्षण ठरले आहेत.
‘या परिसरातील लोक पान खाऊन पिंक टाकताना काळजी घेत नाहीत. त्यामुळे ठेलेचालकाला दरमहा ६० डॉलर दंड भरावा लागतो’, अशी तक्रार गोवर्धन पटेल या ठेलेचालकाने केली.
First Published: Wednesday, August 22, 2012, 19:52