कमी वयाची महिला ठरली बुकर पुरस्काराची विजेती, New Zealand author Eleanor Catton wins 2013 Booker Prize

कमी वयाची महिला ठरली बुकर पुरस्काराची विजेती

कमी वयाची महिला ठरली बुकर पुरस्काराची विजेती
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

यंदाच्या मॅन बुकर पुरस्काराची विजेती सर्वात कमी वयाची महिला ठरली आहे. अवघ्या २८ व्या वर्षी हा पुरस्कार न्यूझीलंडच्या लेखिका एलिनॉर कॅटॉन यांना मिळाला आहे. दरम्यान, या पुरस्काराच्या अंतिम शर्यतीत भारतीय वंशाची अमेरिकन लेखिका झुंपा लाहिरी मागे पडल्यात. त्यांचे `द लोलॅड` हे पुस्तक होते.

एलिनॉर यांच्या `द लुमिनरीज` या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झालाय. ४५ वर्षांच्या बुकर पुरस्कारांच्या इतिहासात सर्वांत कमी वयात हा पुरस्कार मिळविणारी ही लेखिका ठरली आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर एलिनॉर यांनी प्रकाशांचे आभार मानले आहे. पन्नास हजार पौंडचा हा पुरस्कार जिंकल्यानंतर एलिनॉर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलेय, प्रकाशांनी मला लिखाणाचे स्वातंत्र दिल्यानेच, मी एवढे चांगले लिखाण करू शकले.

ज्युरी प्रमुख असलेले रॉबर्ट मॅकफार्लेन यांनी एलिनॉर यांच्या ८४८ पानांच्या कादंबरीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, `द लुमिनरीज` ही सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. याची रचना खूपच चांगली आहे. या कादंबरीची कथा आपल्याला खिळवून ठेवते. सोने आणि लालसा याचे सर्वोत्तम वर्णन या कादंबरीमध्ये केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 16, 2013, 11:59


comments powered by Disqus