नायझेरियामध्ये दोन बॉम्बस्फोटात 118 ठार , nigeria blast , 118 killed

नायझेरियामध्ये दोन बॉम्बस्फोटात 118 ठार

नायझेरियामध्ये  दोन बॉम्बस्फोटात 118 ठार
www.24taas.com, वृत्तसंस्था, नायझेरिया

नायझेरियामध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 118 लोक ठार झालेत. पहिला बॉम्बस्फोट हा गजबजलेल्या एका मार्केटमध्ये झाला तर दुसरा हॉस्पीटलच्या बाहेर झाला. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत.

स्फोटात मृत्यू पडलेल्या 118 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जोस शहरामध्ये ईसाई आणि मुसलमान समुहाचे लोक यांच्यात हिंसक घटना घडत आहेत. काही दिवसांपासून इस्लामी चरमपंथी समूहाच्या बोको हरामने काही इमारतींना टार्गेट करत निशाणा बनवला.

हिंसक घटनानंतर शहरात तनाव वाढला आहे. काही युवकांनी रस्तारोका केला. तर हल्यामध्ये जास्त करून महिलांचा बळी गेला आहे. दरम्यान, काही धार्मिक नेत्यांनी लोकांना शांती राखण्याचे आवाहन केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 21, 2014, 10:46


comments powered by Disqus