Last Updated: Monday, January 20, 2014, 19:48
www.24taas.com, झी मीडिया, पेशावरपाकिस्तानातील पंजाब प्रांतात नऊ वर्षांच्या हिंदू मुलीवर बलात्कार करून तीची हत्या करण्यात आली. पंजाब प्रांतातील रहीमयार खान जिल्ह्यातल्या घुनियामधील ही घटना आहे.
गुरूवारी घराच्या अंगणात खेळणारी मुलगी एकदमच दिसेनाशी झाली. तेव्हा तिच्या आई-वडिलानी आणि नातेवाईकांनी तीचा शोध घेतला आणि त्यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
काल तिचा मृतदेह जवळच्याच शेतात नातेवाईकांना दिसला. पोलिसांनी खानापूर येथील रुग्णालयात मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेला. डॉक्टरांनी पोस्टमार्टम करण्यास नकार दिला. स्थानीक प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर पोस्टमार्टम करण्यात आले. त्यात मुलीचा बलात्कारादरम्यान मृत्यू झाल्याचे उघड झाले.
पाकिस्तानात एकूण लोकसंख्येत केवळ अठरा कोटी हिंदू आहेत ते एकूण लोकसंख्याच्या केवळ दोन टक्के आहेत. त्यामुळे पाकमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहेत. मोठ्याप्रमाणावर हिंदू हे दक्षिण सिंध प्रांतात राहतात. बलूचिस्तानातील दहशतवाद्याकडून हिंदू महिलांचे धर्मांतर आणि अपहरण केले जाते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, January 20, 2014, 18:15