फतवा : दाढीतील `ऊ` मारलीत, तर खाल चाबकाचे ५० फटके No Killing of Believer Lice in Muslim Beards

फतवा : दाढीतील `ऊ` मारलीत, तर खाल चाबकाचे ५० फटके

फतवा : दाढीतील `ऊ` मारलीत, तर खाल चाबकाचे ५० फटके
www.24taas.com, झी मीडिया, दमिश्क

सिरीयाचे राष्ट्रपती बशर अल असद सरकार यांच्या विरोधात लढणाऱ्या फ्री सिरीयन आर्मीच्या सदस्यांनी तालिबान प्रमाणे फतवे काढण्यास सुरूवात केली आहे. त्यापैकी एक फतवा असा आहे, की जर दाढीमधील ऊ मारली, तर चाबकाचे ५० फटके मारण्यात येतील.

सिरीयातील इंग्रजी चॅनल अहलुलबायत न्यूजवर या फतव्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. या फतव्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे, की असद सरकारविरोधात लढणाऱ्या जिहादींनी आपल्या दाढीतील ऊ मारल्यास त्यांना चाबकाचे ५० फटके मारण्यात येतील. या मागचं कारणही तितकंच विक्षिप्त आहे.

‘जिहादच्या काळात पाण्याची कमतरता भासते. यामुळे शरीराच्या साफसफाईकडे लक्ष देता येत नाही. या काळात पवित्र दाढीमध्ये उवा झाल्यास त्या मारू नयेत. कारण जिहाद हे अल्लाचं कार्य आहे. त्यामुळे ते करत असताना दाढीतील उवा मारणं म्हणजे अल्लाला मानणाऱ्या जीवाला मारण्यासारखं आहे.’ असं या फतव्यामध्ये जाहीर केलं आहे.

दाढीला ऊवांमुळे खाज सुटू नये, याकरत दाढीला मेंदी लावावी. मात्र कुठल्याही परिस्थिती ऊवांना मारू नये. तसं केल्यास गुन्हा मानला जाऊन शरिया कायद्यानुसार चाबकाचे ५० फटके लगावण्यात येतील. असं जाहीर करण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 29, 2013, 17:51


comments powered by Disqus