पायलटला `सॅण्डविच`ची लहर; प्रवाशांवर केला कहर, No sandwitch in breakfast, PIA pilots refuse to fly

पायलटला `सॅण्डविच`ची लहर; प्रवाशांवर केला कहर

पायलटला `सॅण्डविच`ची लहर; प्रवाशांवर केला कहर

www.24taas.com, झी मीडिया, लाहोर

एका सॅण्डविचसाठी पायलटनं दोन तास प्रवाशांची त्रेधातिरपीट उडविली... ही घटना घडलीय पाकिस्तानमध्ये...

पाकमध्ये लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना हा अनुभव आलाय. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सचे पीके-७११ सकाळी पावनेसातच्या सुमारास न्यूयॉर्कसाठी उड्डान करणार होतं. पण, तेवढ्यात या विमानाच्या पायलटला - कॅप्टन नौशाद यांना - मात्र सॅण्डविच खाण्याची लहर आली. त्यासाठी त्यांनी खानपान विभागाला फोन करून एका सॅण्डविचची ऑर्डर दिली. यावर सध्या कॅन्टीनमध्ये सॅण्डविच उपलब्ध नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. दुसऱ्या हॉटेलमधून सॅण्डविच आणायचं असेल, तर दोन तास लागतील, असंही त्यांना सांगितलं गेलं.

पण, नौशाद मात्र आपल्या हट्टावर अडून बसले. त्यांनी जेवढा वेळ घ्यायचा तेवढा घ्या, पण मला सॅण्डविच आणून द्या, असं फर्मान सोडलं.

दरम्यान, विमानातील प्रवासी आपापल्या जागेवर आसनस्थ झाले होते. पण, नौशाद यांचं सॅण्डविच येईपर्यंत दोन तास त्यांना त्याच अवस्थेत आपापल्या जागेवर बसून राहावं लागलं. अखेर पावने सातची वेळ असणाऱ्या या विमानानं सव्वा नऊ वाजता उड्डान भरलं. त्यामुळे प्रवासी मात्र चांगलेच चिडले होते.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 16, 2013, 13:25


comments powered by Disqus