शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील नोबेल तिघांना विभागून,Nobel Prize in Physiology or Medicine Distribut

शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील नोबेल तिघांना विभागून

शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील नोबेल तिघांना विभागून
www.24taas.com, वृत्तसंस्था, स्टॉकहोम

यावर्षीचा शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील संशोधनासाठीचा नोबेल पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे. दोन अमेरिकन आणि एक जर्मन असे तीन शास्त्रज्ञ या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. जेम्स ई रोथमन, रँडी डब्ल्यू शेकमन हे अमेरिकन तर थॉमस सी स्युडॉफ हे जर्मन शास्त्रज्ञ आहेत.

मानवी शरीरातील पेशींच्या परिवहनाबाबतच्या या तीन शास्त्रज्ञांनी केलेल्या एकत्रित संशोधनाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. १९८० च्या दशकात या तिघांनी एकत्रितपणे पेशींच्या परिवहनावर अभ्यास सुरू केला.

नोबेल कमिटीचे चेअरमन ज्युलीन झीरथ यांनी आज शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करताना सांगितलं की, या शास्त्रज्ञांनी पेशींच्या मूलभूत परिवहन व्यवस्थेचा शोध आहे. या तीन शास्त्रज्ञांनी पेशींच्या परिवहनाचा गुंता सोडविण्यात मोलाची कामगिरी बजावली असल्याचं नोबेल पुरस्कार समितीने हा पुरस्कार जाहीर करताना म्हटलं आहे.

पेशींमधून रक्तात सोडलं जाणारं इन्सुलीन, नर्व्ह सेल आणि विषाणूंमुळे बाधित झालेल्या सेल्स यांच्यातील संबंधावर प्रकाश या संशोधनामुळे पडणार आहे.

नोबेल विजेते रॉथमन हे अमेरिकेतील येल विद्यापीठाशी संबंधित आहेत तर शेकमन हे कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधन करतात. तर थॉमस स्युडॉफ हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात संशोधन करतात.

शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अतिशय मानाचा समजला जातो. शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील ज्या संशोधनवमुळे मानवी आयुष्य अधिक सुकर होतं, किंवा ज्या शोधामुळे वैद्यकीय उपचार सहज साध्य होतात, अशा क्रांतीकारी संशोधनाला हा पुरस्कार दिला जातो.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 19:18


comments powered by Disqus