Last Updated: Monday, May 12, 2014, 17:35
www.24taas.com, झी मीडिया, लंडन इंग्लंडमध्ये भारतीयांचा भरणा भरपूर आहे. पण याच भारतीयांमध्ये जर का श्रीमंत व्यक्तींची नावं घेण्याची वेळ आलीचं, तर आता या यादीत इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून हिंदुजा ब्रदर्सचं नाव हे अग्रगण्यं राहणार आहे.
संडे टाइम्सने दिलेल्या यादीत हिंदुजा ब्रदर्स हे पहिले, तर यांच्या सोबतच लॉर्ड स्वराज पॉल, लक्ष्मी मित्तल आणि इतर चार व्यक्तींचा ही अब्जाधीशांच्या यादीत समावेश आहे.
श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा या दोन्ही बंधूंची संपत्ती ११.९ अब्ज पौंड इतकी आहे, तर लक्ष्मी मित्तल यांची संपत्ती १०.२५ अब्ज पौंड इतकी आहे. गेल्या वर्षीच्या यादीत मित्तल हे अब्जाधीशांच्या यादीत पहिले होते.
तर हिंदुजा बंधू हे तिसऱ्या स्थानावर होते. पण या वर्षीच्या यादित मित्तल यांना हिंदुजां बंधूंनी आपल्या संपत्तीत १.३ अब्ज पौंडने वाढ करत मागे टाकले आहे.
गेल्या वर्षी हिंदुजा ब्रदर्सनी भारतातील मालमत्तेत केलेली गुंतवणूक, सौदी अरेबियातील पेट्रोमिन कंपनीला विकलेले समभाग, इंडसइंड बँकेतील भांडवल या कारणाने त्यांची संपत्ती वाढल्याचे निदर्शनात आले आहे.
इंग्लंडमधील अब्जाधीशांच्या यादीत अनिल अग्रवाल, अजय कालसी, प्रकाश लोहिया या सारख्या मतब्बर व्यक्तींची नावे देखील आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 12, 2014, 17:35