Last Updated: Wednesday, February 12, 2014, 07:40
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टनअमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि प्रसिद्ध पॉप गायिका बेयोंस नोल्ज यांच्यामधील प्रेमकहाणीची जोरदार सुरू असल्याचे वृत्त एका फ्रेंच वृत्तपत्राने दिल्याने अमेरिकेत चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, बराक यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर मिशेल घटस्फोट घेणार आहे, असेही वृत्त आहे. पहिले वृत्त यूरोप -1 रेडियोने प्रसारित केले.
ओबामा आणि बेयोंस यांच्या प्रेमप्रकणाची बातमी फ्रेंच मीडियामध्ये पसरली आहे. याबाबतचे वृत्त अमेरिकेतील आघाडीचे वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने या वृत्ताचा इन्कार केलाय. मात्र, या वृत्तपत्राकडे याची अधिक माहिती आहे, असा दावा प्रसिद्ध फोटोग्राफरने केलाय.
दरम्यान, हे कथित चक्कर प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. बेयोंस ही ३२ वर्षांची आहे तर ओबामा ५२ वर्षांचे आहेत. दोघंही विवाहित आहेत. अनेकवेळा ओबामा यांनी बेयोंस हिचे सार्वजनिक कार्यक्रमात कौतुक केले आहे. या कथित प्रेमप्रकरणाचा दावा एका फ्रान्सचा फोटोग्राफर पास्कल रोस्टैनने केला आहे. त्याने त्यांची छायाचित्रे काढली आहेत. तसे त्याने म्हटले आहे.
बेयोंस जानेवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या शपथ कार्यक्रमात बेयोंसने राष्ट्रगीत गायले होते. त्यावेळी मिशेल ओबामाही त्यावेळ बराक यांच्यासोबत होती. तसेच मिशेल यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या दिवशीही बेयोंस सहभागी झाली होती. तर तिने निवडणुकीसाठी ओबामा यांना मदत केल्याचे पुढे येत आहे. तर बेयोंस ही सर्वात मादक स्त्री म्हणून निवडली गेली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 12, 2014, 07:40