Last Updated: Wednesday, June 26, 2013, 17:56
www.24taas.com, झी मीडिया, नायजेरिया‘अग्निपरीक्षा द्या आणि लग्नायोग्य व्हा’ हे काही वधूवर सूचक मंडळाचं ब्रीदवाक्य नाही तर ही अट आहे आफ्रिकेतील शारो या जमातीची... रामायणात आपण पतिव्रता पत्नी असल्याचं सिद्ध करण्यासाठी सीतेला कठोर अग्निपरीक्षेला तोंड द्याव लागलं होतं. मात्र आफ्रिकेत याच्या उलटा प्रकार आहे. येथे स्त्रियांना नाही तर पुरुषांनाच अग्निपरीक्षा द्यावी लागतेय.
आफ्रिकेतील शारो जमातीत ही विचित्र परंपरा चालू आहे. माली, नायजेरिया या काही आदिवासी समूहामध्ये तरुणांना लग्नासाठी अत्याचारांचा सामना करावा लागतो. दरवर्षी शारो या प्रजातीतील एखादा तरुणाला लग्न करण्याची इच्छा असली, तर हे त्याने वडिलधाऱ्या मंडळींना सांगावं लागतं. त्यानंतर त्याला फारच भीषण यातनांना सामोरं जावं लागतं.
मात्र यादरम्यान त्याच्या तोंडावर त्रासाचे भाव अजिबात दिसता कामा नयेत. जर तो या परीक्षेत उत्तीर्ण झाला तरच त्याला लग्न करण्यासाठी योग्य समजलं जात. नाहीतर त्याला लग्नावाचूनच रहावं लागत. काही वेळेला या परीक्षेदरम्यान तरुणांचा जीवही जातो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 26, 2013, 17:53