अमेरिकेला वाचवण्याठी ओबामाना हवीय भारतीयांची, Obama invites Indian for consultation on economy

अमेरिकेला वाचवण्याठी ओबामाना हवीय भारतीयांची मदत

अमेरिकेला वाचवण्याठी ओबामाना हवीय भारतीयांची मदत
www.24taas.com,वॉशिंग्टन

मिट रोम्नी यांना पराभूत करून दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झालेल्या बराक ओबामा यांना भारतीय महिलांची मदत हवीय. अमेरिकेला खालावलेल्या आर्थिक परिस्थितून बाहेर काढण्यासाठी ओबामांना मदतीची गजर आहे.

ओबामा यांनी निमंत्रित केलेल्या जगभरातील तज्ज्ञांमध्ये पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांचाही समावेश आहे. तसेच भारतीय वंशाच्या दोन अमेरिकी नागरिकांनाही ओबामांचे निमंत्रण मिळाले आहे. या तज्ज्ञांशी चर्चा करून अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

‘सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस` या वॉशिंग्टनमधील ‘थिंक टॅंक`च्या अध्यक्षा नीरा टंडन आणि ‘सेंटर फॉर कम्युनिटी चेंज`चे दीपक भार्गव यांनाही ओबामांनी निमंत्रण पाठविले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था सावरण्यासाठीचे पर्याय शोधण्यासाठी ओबामांचा हा खटाटोप सुरू आहे.

अन्य निमंत्रितांमध्ये झेरॉक्सबचे मुख्य कार्यकारी अधिकारी उर्सुला बर्न्स यांच्यासह हनीवेल, वॉलमार्ट, जनरल इलेक्ट्रिमक, डाऊ, प्रॉक्टयर अँड गॅंबल, फोर्ड, आयबीएम अशा नामवंत कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ओबामांनी निमंत्रित केलेल्यांमध्ये व्यावसायिक, कामगार, नागरी व्यवस्थापन आणि संसदेतील तज्ज्ञांचा समावेश आहे.

First Published: Tuesday, November 13, 2012, 15:32


comments powered by Disqus