पाकिस्तानात `ओबामा वियाग्रा` लोकप्रिय obama Viagra popular in Pakistan

पाकिस्तानात `ओबामा वियाग्रा` लोकप्रिय

पाकिस्तानात `ओबामा वियाग्रा` लोकप्रिय

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पाकिस्तानाता बराक ओबामा यांच्या नावाने वियाग्रा लोकप्रिय झाला आहे.

संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या देशाचा राष्ट्रपती आणि बराक ओबामा यांचं शक्तिशाली नेतृत्व याचा वापर, वियाग्रा किती शक्तिशाली आहे, हे दाखवण्यासाठी करण्यात येत आहे.

बराक ओबामासह सर्व वियाग्रांवर पाकिस्तानात बंदी आहे. पेशावरमध्ये हा वियाग्रा सर्वात जास्त लोकप्रिय आहे.

निळ्या रंगाच्या पाकिटात हा वियाग्रा विकण्यात येत आहे. जेम्स बॉण्डसारखे बराक ओबामा हातात पिस्तूल घेऊन उभे असल्याचं या वियाग्राच्या पाकिटावर दाखवण्यात आलं आहे.

या वियाग्राची किंमत तशी फारशी नसल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. एका डॉलरमध्ये ४ वियाग्रा, अशी किंमत ठरवण्यात आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 21, 2014, 16:07


comments powered by Disqus