जगातील सर्वांत वृद्ध पुरूषाचं निधन Oldest man of the world dies

जगातील सर्वांत वृद्ध पुरूषाचं निधन

जगातील सर्वांत वृद्ध पुरूषाचं निधन
www.24taas.com, झी मीडिया, योतांगो

जपानमध्ये राहाणारे जगातील सर्वात वृद्ध नागरिक जिरोउमन किमुरा यांचे आज निधन झालं. ते ११६ वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना ‘जगातील सर्वांत जास्त जगणारे पुरूष’ हा सन्मान मिळाला होता.

जिरोउमन यांचा जन्म एप्रिल १८९७ मध्ये झाला. ते ११६ वर्षांचे होते. सुमारे ४० वर्षं जिरोउमन यांनी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी केली होती. तेथून निवृत्तीनंतर सुमारे ५० वर्षं त्यानी शेतीचं काम केलं. ९० व्या वर्षी त्यांनी शेतीचं काम सोडून दिलं. त्यानंतरही ते २६ वर्षं सुखाचे आयुष्य जगत होते. जिरोउमन यांनी आपल्या आयुष्यात कधीही धूम्रपान केलं नाही. आवडते पदार्थ खाणं आणि आनंदाने जगणं हा ते आपल्या आयुष्याचा मंत्र मानत.

जिरोउमन यांना सात मुले, १२ नातवंडे, २५ पतवंडे आणि १५ खापर पतवंडे होती. जिरोउमन ज्या योतांगो शहरात राहातात. त्या शहराला दीर्घायुषी लोकांची परंपराच लाभली आहे. आजही या शहरात शंभरी पार केलेले ९४ लोक असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 12, 2013, 17:12


comments powered by Disqus