एक वर्षाची मुलगी गर्भवती, One year old girl pregnant

एक वर्षाची मुलगी गर्भवती

एक वर्षाची मुलगी गर्भवती
www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली

संपूर्ण जगात खळबळ घालणारी घटना चीनमध्ये उघडकीस आली. जन्म होऊन एक वर्ष होत नाही तोच ती मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार चीनमधील डॉक्टरांनी सांगितला. यामुळे परिसरातील लोकच नाही तर डॉक्टरही चक्रावून गेलेत.

चीनमध्ये एका महिलेने मुलीला जन्म दिला. पण या लहान मुलीचे पोट इतर लहान मुलींसारखे नव्हते. सुरूवातीपासूनच मोठे असलेले पोट दिवसेंदिवस आणखी वाढू लागले होते. ती मुलगी एक वर्षाची झाल्यानंतर तिचे पोट जास्तच वाढले. पोटाला सूज आल्याने तिला डॉक्टरांकडे नेले. मुलीच्या पोटाचे स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या एक वर्षाच्या मुलीच्या पोटात गर्भ असल्याचे समोर आले.

डॉक्टरांनी या मुलीची संपूर्ण तपासणी केल्यानंतर सांगितले की, त्या मुलीच्या आईच्या पोटात दोन मुलांचा गर्भ म्हणजे जुळी मुल वाढत होते. पण एका गर्भाचा संपुर्ण विकास न झाल्याने तो गर्भ त्या मुलीच्या पोटात वाढत होता.

ही घटना अतिशय दुर्मिळ असून ५ लाख घटनेतून एखादी घटना अशी घडते. त्या मुलीची सर्जरी करून गर्भ काढण्यात आला आहे. त्या मुलीला आता कसलाही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 7, 2013, 14:31


comments powered by Disqus