लादेनचा जावई अटकेत, अमेरिकेच्या ताब्यात, Osama bin Laden`s son arrested, brought to the U.S.

लादेनचा जावई अटकेत, अमेरिकेच्या ताब्यात

लादेनचा जावई अटकेत, अमेरिकेच्या ताब्यात
www.24taas.com,वॉशिंग्टन

आंतरराष्ट्रीय दशहतवादी ओसामा बिन लादेन याचा जावई सुलेमान अबू गैथ याला अटक करण्यात आली आहे. त्याला अमेरिकेने ताब्यात घेतले आहे.

लादेन याचा खात्मा एबटाबाद येथे त्याच्या राहत्या घरी अमेरिकेने केला होता. त्यानंतर अमेरिकेत जल्लोष साजरा करण्यात आला होता. सुलेमान हा ओसामा बिन लादेन याचा प्रवक्ता होता, असे अटकेचे वृत्त देणाऱ्या पीटीआयने म्हटलं आहे.

दहशतवादी विरोधी कारवाई करताना लादेनचा जावई सुलेमान याला अटक केली गेली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली, असे पीटीआयने म्हटलं आहे.

सुलेमानला अटक करणे हा एक दहशतवादी कारवाईची माहिती मिळण्यासाठी हा महत्वाचा दुवा मानला जात आहे. सुलेमानला न्यूयॉर्क येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

First Published: Friday, March 8, 2013, 20:00


comments powered by Disqus