भ्रष्टाचारापुढे लादेननेही टेकले होते हातOsama had to bribe in Pakistan

भ्रष्टाचारापुढे लादेननेही टेकले होते हात

भ्रष्टाचारापुढे लादेननेही टेकले होते हात
www.24taas.com, इस्लामाबाद

जगभरात दहशत पसरवणारा अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानात लाच देऊन काम करावं लागल्याचं त्याच्या रोजनिशीतून समोर आलं आहे. भ्रष्टाचारासमोर दहशतवादालाही हात टेकावे लागलं असल्याचं हे एक उदाहरण मानता येईल.

पाकिस्तानातल्या अबोटाबाद येथे गेल्या वर्षी 2 मे रोजी अमेरिकेच्या नेव्ही सील्स कमांडोंनी लादेनचा खात्मा केला होता. सर्व जगाच्या डोळ्यांत धूळ फेकून ओसामा पाकिस्तानात भूमिगत झाला होता. 3 मजल्याच्या हवेलीत गुप्तपणे राहाणाऱ्या ओसामाला या घरासाठी स्थानिक तलाठ्याला ५० हजार रुपयांची लाच द्यावी लागली होती. हा उल्लेख ओसामाच्या रोजनिशीत आढळून आला आहे.

ओसामाला पाकिस्तानच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानी सुरक्षा दलाने संबंधित तलाठ्याला यापूर्वीच अटक केलं होतं. मात्र त्याने लाच घेतल्याची तेव्हा कल्पना नव्हती. मात्र ओसामाचं पाकिस्तानातील वास्तव्य आणि अमेरिकेची कारवाई यांबद्दल न्यायालयीन चौकशी करणाऱ्या न्यायालयीन आयोगाने सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आणला आहे.त्यामुळे दहशतवाद्यालाही भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत असल्याचं दिसून आलंय.

First Published: Thursday, December 27, 2012, 17:32


comments powered by Disqus