ओसामाला अमेरिकेने मारलंच नाही, त्याने केली होती आत्महत्या! Osama`s death was suicide?

ओसामाला अमेरिकेने मारलंच नाही, त्याने केली होती आत्महत्या!

ओसामाला अमेरिकेने मारलंच नाही, त्याने केली होती आत्महत्या!
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन

अल- कायदाचा प्रमुख आतंकवादी ओसामा बिन लादेन याची २ मे, २०११ रोजी हत्या करून अमेरिकेने स्वतःची पाठ थोपटली होती. मात्र ओसामाला अमेरिकेने संपवले नसून त्याने स्वतःच आत्महत्या केली होती, असा गौप्यस्फोट झाला आहे.

ओसामाच्या माजी अंगरक्षकाने खुलासा केला आहे की ओसामा बिन लादेननेच स्वतःला मारले होते. अंगरक्षकाच्या म्हणण्यानुसार ओसामाला अमेरिकन नेव्ही सील्सने मारलं नसून त्याने स्वतःच बॉम्बने स्वतःला उध्वस्त केलं होतं. या अंगरक्षकाच्या म्हणण्यात किती तथ्य आहे, याबद्दल अमेरिकेने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

लादेनचा माजी अंगरक्षक नबील अब्दुल फतेह हा ओसामाच्या मृत्यूसमयी तेथे उपस्थित नव्हता. मात्र ओसामाला अमेरिकेने मारलं नव्हतं, या आपल्या म्हणण्यावर तो ठाम आहे. तसंच ओसामाचं शव अमेरिकन नेव्ही सील्सने समुद्रात दफन करण्याच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

२ मे २०११ रोजी अमेरिकन सील कमांडरांनी ओसामा बिन लादेनची पाकिस्तानातल्या ऍबोटाबादमध्ये हत्या केली होती. मात्र हा सर्व बनाव रचला गेला असून यात काहीही तथ्य नसल्याचं नबीलचं म्हणणं आहे. नईम असंही म्हणाला की ओसामा गेली १० वर्ष बॉम्ब अडकवलेला पट्टा अंगावर बांधून राहात होता. पकडलं गेल्यावर त्याने आपल्या अंगावरील बॉम्बनीच स्वतःला मारलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 30, 2013, 15:58


comments powered by Disqus