`ऑक्सफर्ड डिक्शनरी`ची नवी रीत, नियम मोडून शब्दकोशात `ट्विट` Oxford Dictionary adds Tweet

`ऑक्सफर्ड`ची नवी रीत, नियम मोडून शब्दकोशात `ट्विट`

`ऑक्सफर्ड`ची नवी रीत, नियम मोडून शब्दकोशात `ट्विट`
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

ट्विटरवर ‘ट्विट’ करणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. सोशल नेटवर्किंग साइटवरील `ट्विट` हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरीने आपला एक महत्वाचा नियमही मोडला आहे.

कुठलाही नवा शब्द जर दहा वर्षांपेक्षा जास्त काळ वापरात असेल, तरच तो ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाविष्ट करण्यात येतो. मात्र ‘ट्विट’ हा शब्द अपवाद ठरला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीचे मुख्य संपादक जॉन सिंपसन म्हणाले, की संज्ञा आणि क्रिया स्वरुपात ‘ट्विट’ हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे.

पक्ष्यांची किलबिल या अर्थाने ट्विट हा शब्द आधीपासूनच ऑक्सफर्ड डिक्शनरीत वाचायला मिळतो. पण २०१३ च्या जूनमध्ये प्रकाशित होणाऱ्या नव्या आवृत्तीत ट्विट या शब्दाचा नवा अर्थही वाचायला मिळणार आहे. गंमत म्हणजे, ‘रिट्विट’ हा शब्द मात्र २०११मध्येच ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट केला गेला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 18, 2013, 18:07


comments powered by Disqus