Last Updated: Tuesday, February 18, 2014, 15:57
www.24taas.com, झी मीडिया, कराचीपाकिस्तानमध्ये बळजबरीने केल्या जात असलेल्या धर्मांतरामुळे येथील अल्पसंख्याक हिंदू समुदाय त्रस्त झाला आहे. हिंदूंमधील लहान मुलींनाही बळ्जबरीने धर्म बदलण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार येथील हिंदूंनी केली आहे.
मुस्लिम मुलींचे धमकावून हिंदूंशी लग्न करण्यास भाग पाडले, तर चालेल का? असा प्रश्न येथील हिंदू राज कुमार यांनी विचारला. कुमार यांची भाची रिंकल कुमारी हिला २०१२ मध्ये एका मुस्लीम युवकाशी बळजबरीने लग्न करण्यास भाग पाडण्यात आले होते.
रिंकल हिच्या बळजबरीने करण्यात आलेल्या धर्मांतरणामुळे पाकमध्ये खळबळ उडाली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 18, 2014, 13:38