पाक राष्ट्रपतींची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी, Pak PM agrees to reopen graft case against Zardari

पाक राष्ट्रपतींची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी

पाक राष्ट्रपतींची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी
www.24taas.com,इस्लामाबाद

पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी होणार आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान हे सांगितलयं. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर झरदारी यांच्याविरोधातले अनेक खटल्यांवरील सुनावणी बंद झालीये. ही सुनावणी आता सुरु होणार आहे.

पाकिस्तानी पंतप्रधानांना यापुढं सुनावणीसाठी कोर्टात येण्याची गरज नसल्याचंही यावेळी कोर्टाकडून सांगण्यात आलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी २५ सप्टेंबरला होणार आहे.

First Published: Tuesday, September 18, 2012, 13:38


comments powered by Disqus