Last Updated: Sunday, May 12, 2013, 08:42
www.24taas.com, झी मीडिया, कराची साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या पाकिस्तानातल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या मतमोजणीत नवाज शरीफ आणि इमरान खान यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे. नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग एन सुरूवातीपासूनच आघाडीवर आहे. तर इम्रान खानचा तेहरीक-ए-इन्साफ दुस-या क्रमांकावर आहे.
नवाझ शरीफ हे पंजाबच्या सरगोधा येथून निवडून आले असून त्यांच्या पक्षाने १२६ जागांवर आघाडी घेतली आहे. पेशावरमधून इम्रान खान विजयी झालेत. पीपीपीच्या आसिफ अली झरदारी यांची मात्र मतमोजणीत पीछेहाट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
आरोप प्रत्यारोप आणि स्फोटांच्या दहशतीच्या छायेत पाकिस्तानच्या जनतेनं मतदानाचा हक्क बजावला...पाकिस्तानात जवळपास ६५० टन बॅलेट पेपर आहेत. तिथं भारताप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन सिस्टिम नाही. त्यामुळं मतमोजणी धीम्या गतीनं सुरु आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 12, 2013, 07:57