Last Updated: Friday, August 10, 2012, 16:06
www.24taas.com, ढाकाकाश्मिरवरून भारत आणि पाकिस्तान यांमध्ये सुरू असणाऱ्या वादानंतर पाकिस्तानी सैन्याने भारताला उध्वस्त करण्यासाठीच अण्वस्त्र क्षमता वाढवण्यास सुरूवात केली आहे. कुठल्याही क्षणी पाकिस्तान भारतावर हल्ला करू शकतो अशी भीती बांग्लादेशचे भारतातील उच्चायुक्त तारीक करीम यांनी व्यक्त केली आहे.
भारताने लोकशाही मार्गाने स्वतःचा विकास केला. मात्र पाकिस्तानने विकासापेक्षा भारताशी स्पर्धा करण्यातच धन्यता मानली. पाकिस्तानने ही स्पर्धा केवळ शस्त्रास्त्रांपुरताच मर्यादित ठेवली. यामुळे पाकिस्तानचा विकास झाला नाही. पाकिस्तान यामळे मागासलेलाच राहिला. मात्र भारताने आपला विकास केला.
पाकिस्तानने मनात आणलं तर, केवळ ८ सेकंदांमध्ये भारतावर हल्ला करू शकतो असा दावा करीम यांनी केला आहे. करीम यांच्यापूर्वी एका ब्रिटीश मुत्सद्यानेही हा दावा केला होता.
First Published: Friday, August 10, 2012, 16:06